testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रमोशन हवे मग सुटलेले पोट कमी करा

police officer
Last Modified गुरूवार, 6 जुलै 2017 (12:08 IST)

पोट सुटलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना आता सुटलेले पोट कमी करावे लागणार आहे, कारण त्याशिवाय त्यांना प्रमोशन मिळणार नाही. आयपीएस अधिकाऱ्यांच्या प्रमोशनचा संबंध फिटनेसशी जोडण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे, त्यामुळे आता आयपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन पाहिजे असेल तर वाढलेली चरबी त्यांना अनिवार्यपणे कमी करावी लागणार आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्यासाठी त्यांचा “फिजिकल फिटनेस’ हा अनिवार्य मुद्दा असावा अशी सूचना गृह मंत्रालयाने केली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सेवा नियमावलीचा एक मसूदा तयार केला असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे त्यांच्या टिप्पणीसाठी पाठवला आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या नियमावलीत फिजिकल फिटनेसबाबत अशा प्रकारची कोणतीही तरतूद नसल्यामुळे ठरावीक वर्षे सेवा झाल्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांना आपोआप प्रमोशन मिळत असे. प्रमोशनचा संबंध शारीरिक क्षमतेशी जोडण्याने आता सीएपीएफ (सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स) च्या अ वर्गातील अधिकाऱ्यांच्या पातळीवर त्यांचे प्रमोशन येईल असे सांगण्यात आले आहे.यावर अधिक वाचा :