बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 जुलै 2017 (17:25 IST)

तृतीय पंथी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण

तृतीय पंथी विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मोफत शिक्षण देणार आहे. तृतीय पंथी विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचा हक्क मिळावा तसंच उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना मार्ग मोकळा व्हावा, यासाठी 'इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीने  देशातील सगळ्या तृतीय पंथी विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयानुसार देशभरात असलेल्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीच्या सर्व केंद्रांमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे. 
 
तृतीय पंथियांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी आम्ही काही तृतीय पंथी कार्यकर्त्यांची मदत घेतली आहे. किमान पाच जणांचं यावेळी युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी नोंद करण्याचं आमचं ध्येय आहे, असं इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचे लखनऊमधील विभागीय संचालक मनोरमा सिंह यांनी सांगितलं आहे. या जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्टिफिकेट अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ जुलै असून इतर अभ्यासक्रमांसाठी ती ३१ जुलै अशी आहे.