testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

भारत आणि अमेरिकेने पाकिस्तानला ठणकावले

आणि अमेरिकेने
पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवादाला थारा देऊ नका अशा शब्दात ठणकावले आहे. पठाणकोट आणि २६/११ च्या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. आणि दहशतवाद्यांच्या आश्रयस्थान नष्ट करण्याचा निर्धारही या दोन्ही नेत्यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बहुचर्चित भेट सोमवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) पार पडली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे जगभराचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीनंतर मोदी आणि ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

दहशतावाद नष्ट करणे यावर आमचा भर असेल असे ट्रम्प यांनी सांगितले. आम्ही दहशतवाद, कट्टरतावाद यावर चर्चा केली असून याविरोधात एकमेकांना सहकार्य करण्यावर एकमत झाल्याचे मोदींनी सांगितले.


यावर अधिक वाचा :