शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

धूम्रपानामुळे होणार्‍या मृत्यूंमध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर

नवी दिल्ली- धूम्रपान करणे आरोग्यास कितीही गंभीर आजार होत असले तरी धूम्रपान करणार्‍यांच्या संख्येत काही घट नाही. नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार धूम्रपानामुळे 11 टक्के लोक जगभरात मृत्यूमुखी पडले आहे आणि त्यातले 50 टक्के लोकं हे चीन, भारत, अमेरिका आणि रशिया देशातले होते.
या चार देशांमध्ये धूम्रपानामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अधिक आहे. चीनमध्ये धूम्रपान करणार्‍यांमुळे सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे यानंतर भारताचा क्रमांक लागतो. अमेरिका आणि रशिया अनुक्रमे तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावर आहे. 2015 मध्ये आरोग्याच्या समस्येमुळे 64 लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यात 11 टक्के मृत्यू हे केवळ धूम्रपानामुळे झाले होते. मेडिकल जर्नल ऑफ ल्रन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतात धूम्रपान करण्यार्‍यांची संख्या अधिक आहे. जगातील एकूण धूम्रपान करण्यांपैकी दुर्देवाने 11 टक्के स्मोकर्स हे भारतात आहे. त्यातूनही पुरूषांची संख्या ही अधिक आहे.
 
धूम्रपानाची समस्याही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. भारतात धूम्रपानाविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्याचप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थावरही वैधानिक इशारा देणे बंधनकारक आहे.