गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

लष्कराने नियंत्रण रेषेवर उद्ध्वस्त केल्या (LoC) PAK चौक्या

भारतीय लष्कराने पाकिस्तानी सेनेविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराने नौशेरा सेक्टरमध्ये 20-21 मे रोजी हे ऑपरेशन चालवले होते. सेनेने सारखी होत असलेली घुसखोरी विरोधात ही कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लागोपाठ होत असलेले दहशतवादी हल्ल्यांबद्दल मंगळवारी भारतीय सेनेने प्रेस कांफ्रेंस केली.   
 
घुसखोरीला मदत केली तर अशाच प्रकारची कारवाई यापुढेही केली जाईल असा संदेश लष्कराने दिला आहे. भारताची ही कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नाहीय. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात भारताने सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा भारतीय लष्कराच्या विशेष कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. यावेळी भारतीय सैन्याने आपल्याच हद्दीतच राहून जोरदार गोळीबार आणि तोफगोळयांचा वर्षाव केला. ज्यामध्ये पाकिस्तानी चौक्या आणि त्यांचे बंकर उद्ध्वस्त झाले. 
 
नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्य भारतीय जवानांना गोळीबारामध्ये गुंतवून ठेवते. त्यामुळे दहशतवाद्यांना घुसखोरी करणे सोपे जाते. घुसखोरी करताना हे दहशतवादी गावक-यांवरही हल्ला करायला मागे पुढे पाहत नाहीत असे मेजर नरुला यांनी सांगितले. बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यानंतर काश्मीरमध्ये घुसखोरीच्या घटना वाढतात.