शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 20 मे 2015 (14:32 IST)

INDIAN INTELLIGENCE AGENCY ने पाक स्थित दाऊदच्या घराचा शोध लावला

भारतीय गुप्तचर एजन्सीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे पाकिस्तान स्थित त्या घराला ट्रेक केले आहे ज्यात तो लपून बसला आहे. असे सांगण्यात येत आहे की दाऊद सध्या पाकच्या मुर्री रोड़वर राहत आहे. दिलेल्या वृत्तानुसार पाकची गुप्तचर एजन्सी आयएसआय दाऊदची मेजवानी करत आहे. दाऊद आणि त्याचे कुटुंबीयांजवळ पाकचा पासपोर्टपण आहे. दाऊद जवळ पाकिस्तान द्वारे जारी करण्यात आलेले तीन पासपोर्ट आहे, ज्यांचा जी-866537, सी-267185 आणि केसी-285901 आहे.  
 
महत्त्वाचे म्हणजे काही दिवस अगोदर पहिले भारतीय केंद्र सरकारला दाऊदच्या ठिकाण्यांबद्दल दिले गेलेले विवादित विधानामुळे फार टीका सहन करावी लागली होती. मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर होम मिनिस्ट्री हरिभाई पराथी भाई चौधरी यांनी पाच मे रोजी म्हटले होते की भारतीय गुप्तचर एजन्सीला दाऊदच्या राहण्याच्या जागेची माहिती नाही आहे. पण नंतर गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी आश्वासन दिले होते की दाऊदला परत भारतात बोलवण्यात येईल.