Widgets Magazine
Widgets Magazine

कुपवाडा सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नातील चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

श्रीनगर, सोमवार, 10 एप्रिल 2017 (11:10 IST)

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या चार दहशतवाद्यांना सैन्याने कंठस्नान घालले आहे. दहशतवाद्यांनी रविवारी रात्रीच्या अंधारात हा घुसखोरीचा प्रयत्न केला होता.
 
कुपवाडामधील केरनमध्ये काही दहशतवादी भारतात घुसखोरी करत होते. या दरम्यान गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी या दहशतवाद्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने हे दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात होते. या भागात अजूनही सैन्याची शोधमोहीम सुरु आहे.
 
गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीच्या ३७० घटना घडल्या. २०१५ मध्ये हे प्रमाण १२२ एवढेच होते. म्हणजेच सरासरी बघितल्यास २०१६ मध्ये दररोज पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

दिंडोशीतील मनसेच्या 'संवाद कार्यकर्त्यांशी' मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!

दिंडोशी विभागातील मनसे संघटन शक्तीला आलेली मरगळ झटकण्यासाठी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी ...

news

एनडीए महत्वपूर्ण बैठक, राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा होणार

दिल्लीत सोमवारी एनडीए पक्षांची महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे ...

news

आर के नगरची पोटनिवडणूक रद्द

तामिळनाडूतील आर के नगर मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय ...

news

राज्यात तापमान वाढणार

येत्या 48 तासांमध्ये राज्यात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. ...

Widgets Magazine