Widgets Magazine

पाकिस्तानकडून कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गोळीबार

सोमवार, 12 जून 2017 (11:12 IST)

Widgets Magazine
pakistani

जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले.
 
आज सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबाराला सुरूवात केली.
 
सध्यादेखील हा गोळीबार सुरू असून पाकिस्तानकडून लहान आणि स्वयंचलित बंदुका आणि उखळी तोफांचा जोरदार मारा सुरू आहे.
 
भारतीय सैन्यही पाकच्या या गोळीबाराला तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहे. तर दुसरीकडे शोपियान जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर हल्ला चढवण्यात आला.
 
शोपियान पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. मात्र, सीआरपीएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत हा हल्ला निष्प्रभ ठरवला. त्यामुळे दहशतवाद्यांना पळ काढावा लागला.
 
दरम्यान, हल्ल्याच्यावेळी दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे तीन पोलीस आणि सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. 



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

जेईई अॅडव्हान्स: पुण्याचा अक्षत चुघ दुसरा

नवी दिल्ली- इन्सिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या अग्रगण्य केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षण ...

news

11 काश्मिरी बनले लष्करी ‍‍‍अधिकारी

डेहराड़न- जम्मू- काश्मीरमधील 11 तरुणांनी इंडियन मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली असून ...

news

वीज पडून तिघांचा मूत्यू

नाशिक जिल्ह्यात दोन घटनांमध्ये वीज पडून तिघांचा अंत झाला आहे. यात पिता पुत्राचा समावेश ...

news

नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमन

त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान झालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे शनिवारी सकाळी ...

Widgets Magazine