testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

काश्मीर चकमक: दोन दहशतवादी ठार, दोन जवान शहीद

काश्मीरमधील बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालतांना प्रत्युत्तर देताना दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष सुरु आहे. अद्यापही भारतीय जवानांकडून या भागात ऑपरेशन सुरुच आहे.

बांदिपोरामधील हाजिन भागातील परिबाल गावात पहाटेपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले.यावर अधिक वाचा :