शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जयललिता यांचा प्रवास....

* जयललिता यांनी वयाच्या 15व्या वर्षी 'चिन्नद गोम्बे' या कन्नड चित्रपटातून पदार्पण केले. 
* जयललिता यांनी शास्त्रीय संगीत, पाश्चिमात्य शास्त्रीय प्रियानोवादन, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, मणिपुरी आणि कथ्थक या नृत्याप्रकारांचे व्यावसायिक शिक्षण घेतले होते. 
* जयललितांची ओळख आता पुरतची थलाइवी (क्रांतिकारी नेत्या) अशी. त्यांना जवळजे कुटुंबीय आणि सहकलाकार 'अम्मू' या नावाने ओळखत.
* एम.जी. रामचंद्रन यांच्यासमवेत जयललिता यांनी तमिळी चित्रपट ऐराथील ओरुवनमध्ये प्रमुख भूमिका केली. 
* 1968 मध्ये धर्मेंद्रबरोबर त्यांनी 'इज्जत' या एकमेव हिंदी चित्रपटात काम केले होते.  
* 1965 तो 1980च्य काळात त्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्री होत्या. 140 चित्रपटात त्यांनी या काळात काम केले व त्यापैकी 120 सुपरहीट झाले. 
* 1960 ते 70 च्या दशकात एम.जी. रामचंद्रन यांच्यासोबत अनेक चित्रपटात त्यांची जोडी हीट ठरली. 1982 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एमजीआर यांनी जयललीता यांना अण्णाद्रमुकमध्ये प्रवेश दिला. 
* 1984 व 1989 मध्ये जयललिता यांनी राज्यसभेत अण्णाद्रमुकमध्ये खासदार म्हणून काम केले.
* 1984 मध्ये एमजीआर आजारी पडल्यावर जयललिता यांनी मुख्यमंत्रिपट 
मिळविण्याच्या प्रयत्न केल्याने अण्णाद्रमुकमध्ये फूट पडली. एका गटाने रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी यांना पाठिंबा दिला होता. 
* 1989 मध्ये तमिळनाडू विधानसभेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होण्याचा मान त्यांना मिळाला. त्याच वर्षी अण्णाद्रमुकच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले व एकमताने जयललिता यांना नेता म्हणून स्वीकारण्यात आले. 
*द्रमुकच्या आमदारांनी विधासभेत त्यांच्यावर हल्ला केला होता. फाटलेल्या साडीत त्या सभागृहात बाहेर आल्या. तेव्हा जनतेमधून त्यांना मोठी सहानुभूती मिळाली होती. 
* 1995 मध्ये त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. सर्वात लहान वयात मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. 
* 1996 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 
* 2001 मध्ये त्या दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध निकाल दिल्याने मुख्यमंत्रिपद सोडणे भाग पडले. 2003मध्ये सर्व खटल्यांमधून निर्दोष सुटल्यावर त्या पुन्हा मुख्‍यमंत्री झाल्या. 
* 2011 मध्ये त्या तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाल्या. 2014मध्ये त्यांना 4 वर्षांची शिक्षा झाल्याने पद सोडावे लागले. 
* 2015मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यावर त्या पुन्हा मुख्यमंत्री झाल्या. 
* 2016 मध्ये त्या मुख्यमंत्री झाल्या. 32 वर्षात पुन्हा सत्तेवर येणार्‍या त्या पहिल्याच मुख्यमंत्री ठरल्या. 
* मुख्यमंत्रिपदासाठी अवघे एक रुपया वेतन घेत होत्या.