बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (12:08 IST)

जयललिता एक उत्तम प्रशासक होत्या - सुमित्रा महाजन

- चेन्नई : सुपरस्टार रजिनकांत यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे अंत्यदर्शन घेऊन वाहिली श्रद्धांजली
- जयललिता लढवय्या होत्या, देशातील अनेक महिला नेत्यांची त्या प्रेरणा होत्या - के.कविता, टीआरएस.
- जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या निकटवर्तीय शशिकला यांना अण्णाद्रुमूकचं अध्यक्षपद मिळण्याची शक्यता - सुत्रांची माहिती.
- जयललिता एक उत्तम प्रशासक होत्या, राजकारणासाठी हे मोठं नुकसान आहे - सुमित्रा महाजन.
- जयललिता लढवय्या होत्या, शेवटच्या क्षणापर्यंत त्या लढल्या, त्यांनी सर्व लढाया जिंकल्या, पण एका लढाईत प्रत्येकाचा पराभव होतो तसा त्यांचाही झाला - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.
- जयललिता यांच्या निधनाने फक्त तामिळनाडूचे नाही तर, संपूर्ण देशाचे नुकसान झाले आहे, आज संपूर्ण बिहार दु:खात आहे - नितीश कुमार, बिहार मुख्यमंत्री.
- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे देशाचे खूप नुकसान झाले आहे. देश जुलुमशाहीकडे जात असताना जयललितांसारख्या नेत्याची गरज होती - लालू प्रसाद यादव
- चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या अंत्यविधिची मरीना बीचवर तयारी सुरू, संध्याकाळी 4.30 वाजता जयललितांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांना राज्यसभेत श्रद्धांजली वाहिल्यानंतर राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित करण्यात येणार.
- नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एकदिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर, राष्ट्रपती भवनावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला.
- नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चेन्नईकडे रवाना
- राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य दिग्गज नेते तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी चेन्नईला जाणार
- जयललितांच्या अंत्यसंस्कारादरम्यान केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू आणि राधाकृष्णन केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व करणार.
- जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चेन्नईला जाणार.
- जयललितांच्या अंत्यदर्शनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार, संध्याकाळी 4.30 वाजता चेन्नईत दाखल होणार.
- जयललितांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 4 वाजता करण्यात येणार अंत्यसंस्कार, 7 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर.
- नवी दिल्ली- जयललितांशी बोलण्यासाठी मी नेहमीच संधी शोधायचो, त्यांच्या आत्माला शांती लाभो- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
- तामिळनाडू- राजाजी हॉलच्या बाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था
- तामिळनाडू- जयललितांचं पार्थिव राजाजी हॉलमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवणार
- जयललितांच्या निधनानंतर बिहार राज्यानं केला एक दिवसाचा दुखवटा जाहीर
- तामिळनाडूमध्ये 7 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर
- नवी दिल्ली- जयललिता यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठे दु:ख झाले असून, त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाची न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांला तळागळातील लोकांशी दांडगा संपर्क होता. त्या गरिबांची काळजी घ्यायच्या. त्या कायम प्रेरणा असतील- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
- नवी दिल्ली- लाखो लोकांचा आदर्श असलेली अशी एक व्यक्ती राष्ट्राने गमावली. तामिळनाडूच्या विकासासाठी त्यांनी दिलेला लढा आणि केलेले काम दीर्घकाळ लक्षात राहील- प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती
- तामिळनाडूमध्ये शाळा आणि कॉलेजांना तीन दिवसांची सुटी जाहीर
- नवी दिल्ली- AIADMKचे ज्येष्ठ नेते पनीरसेल्वम तामिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री
- चेन्नई: तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन