testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दीपक मिश्रा देशाचे सरन्यायाधीश

dipik mishra
Last Modified बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (13:19 IST)

सर्वोच्च न्यायालयाचे सर्वांत वरिष्ठ न्यायाधीश दीपक मिश्रा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. ते विद्यमान सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांची जागा घेतील. खेहर 27 ऑगस्टला निवृत्त होणार आहेत.

देशाचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून 63 वर्षीय मिश्रा यांच्या नियुक्तीबाबतची अधिसूचना केंद्रीय विधी मंत्रालयाने जारी केली. ते 13 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सरन्यायाधीशपदाची धुरा सांभाळतील. मिश्रा यांनी 1977 मध्ये ओडिशात वकिली सुरू केली. जानेवारी 1996 मध्ये त्यांची ओरिसा उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पाटणा आणि दिल्ली उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी कार्य केले. ऑक्‍टोबर 2011 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.

दिल्लीतील खळबळजनक निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चार दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्‍कामोर्तब करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाचे नेतृत्व मिश्रा यांनी केले. मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने अभूतपूर्व पाऊल उचलताना पहाटेच्या सुमारास शिक्‍कामोर्तब केले. त्या सुनावणीतही मिश्रा सहभागी होते. आता अयोध्येतील राममंदिरासारख्या महत्वाच्या प्रकरणांची सुनावणी त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.यावर अधिक वाचा :