शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

कुलभूषण यांची फाशी माफ करा, आईची मागणी

कुलभूषण जाधव यांची फाशी माफ करा, अशी मागणी जाधव यांच्या आईने पाकिस्तान सरकारकडे केली आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीविरोधात त्यांची आई अवंती सुधीर जाधव यांनी पाकिस्तानच्या अपिलीय कोर्टात अपील केले आहे. पाकिस्तानच्या लष्करी कायद्यातील कलम 133 (ब) नुसार कोर्टात हे अपील करण्यात आले आहे.
 
पाकच्या रावळपिंडीतील लष्करी कोर्टाने हेरगिरीप्रकरणी जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यानंतर भारत-पाकमधील संबंध ताणले गेलेत. दरम्यान, कुलभूषण जाधव प्रकरणी वकील देण्याची मागणी भारताने केली होती. पण पाकिस्तानाने पुन्हा ही मागणी धुडकावून लावली आहे. कुलभूषण जाधववर हेरगिरी प्रकरणी कारवाई झाली आहे. यामुळे द्वीपक्षीय संबंधानुसार जाधवाना वकील देता येणार नाही, असे उलट उत्तर पाकने दिले आहे.