Widgets Magazine

सिंध हा भारताचा भाग नाही याचे वाईट वाटते: अडवाणी

माझा जन्म ज्या सिंध प्रांतात झाला तो आज भारतात नाही याचे मला अजूनही वाईट वाटते, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. मी कोणत्याही देशाचे थेट नाव घेणार नाही. पण आशियातील बरेच देश असे आहेत की ज्यांच्यासोबत भारताचे संबंध सुधारल्यास मला आनंदच होईल असेही ते म्हणाले.
इंडिया फाउंडेशन अवेरनेस या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आदी मान्यवर मंडळी सहभागी झाली होती. या कार्यक्रमात अडवाणींनी त्यांच्या मन की बात सांगितली.


यावर अधिक वाचा :