बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (08:50 IST)

शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर येथील ईशा योग केंद्रात भगवान शंकराच्या 112 फूट उंच मूर्तीचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ही मूर्ती दगडाऐवजी स्टीलचे तुकडे जोडून तयार करण्यात आली आहे. तसेच, येथील नंदीची मूर्तीही तिळाचे बी, हळद, भस्म आणि रेती तसेच मातीपासून बनविण्यात आली आहे.   यावेळी ईशा फाउंडेशनचे संस्थापक योगगुरु जग्गी वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी आणि भाविक उपस्थित होते. भारताने जगाला योगाची भेट दिली आहे. योगामुळे एकात्मतेची भावना निर्माण होते. एखादी संकल्पना केवळ ती प्राचीन आहे म्हणून नाकारणे घातक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.