testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

साईबाबा यांच्यासह अन्य पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

Last Modified मंगळवार, 7 मार्च 2017 (16:43 IST)
नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक गोकराकोंडा नागा साईबाबा यांना न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. साईबाबा यांच्यासह अन्य पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रा. गोकराकोंडा नागा साईबाबा यांच्यासह प्रशांत राही, हेम मिश्रा, विजय तिरकी, महेश तिरकी आणि पांडू नरोटे यांना देशविघातक कृत्य, बंदी संघटनांचा सदस्य असणे, प्रचार करणे आदी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली. विजय तिरकी यांना 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
साईबाबा यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा खटला दररोज चालवण्याचे आदेश दिले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र सुनावणी दरम्यान गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


यावर अधिक वाचा :