testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

या ट्रेनमध्ये पुरूष वर्जित

train
कोलकाता आणि जवळपासच्या क्षेत्रात चालणारी स्त्रियांसाठी विशेष ट्रेन आहे. यात पुरुषांना प्रवेश वर्जित आहे. याच कारणामुळे वाद निर्माण होतो.
रेल एकमेव पर्याय
भारतात रेल्वे म्हणजे जीवनरेषा. पश्चिम बंगाल येथील अनेक महिला आवागमनासाठी रेल्वेवर निर्भर आहे.

केवळ स्त्रियांसाठी
भारतीय रेल्वेत महिलांसाठी वेगळे डबे असतात परंतू त्यात खूप गर्दी असते. अनेकदा उभे राहण्यासाठीदेखील जागा नसते.

वाद
महिला डब्यात जागा नसल्यामुळे अनेकदा महिलांना सामान्य डब्यात यात्रा करावी लागते अशात अनेकदा पुरुषांसोबत वाद निर्माण होतं.
घाई
गर्दी, धक्का- मुक्की हे रेल्वेसाठी सामान्य बाब असली तरी अशात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मातृभूमी
महिलांना होत असलेल्या या त्रासामुळे कोलकाताने मातृभूमी लोकल नावाने वेगळी ट्रेन सुरू करण्याचा विचार केला.

आरामदायक प्रवास
2010 मध्ये महिलांसाठी मातृभूमी स्पेशल नावाने विशेष ट्रेन चालवली.
तक्रार
दुसर्‍या ट्रेनमध्ये जाम गर्दी असते आणि मातृभूमी लोकलमधील काही सीट्स रिकाम्या असतात. याबद्दल पुरुषांची तक्रार असते.

विरोध
2015 मध्ये या ट्रेनचे तीन डबे जनरल कोच म्हणून त्यात पुरुषांना यात्रा करण्याची परवानगी देण्यात आली. परंतू महिलांना विरोध केल्यावर पुन्हा ही ट्रेन लेडीज स्पेशल करावी लागली.

पुरुषांची मागणी
नाराज पुरुषांनी मातृभूमी बंद व्हावी किंवा पुरुषांसाठी पितृभूमी लोकल नावाने नवीन सेवा सुरू करावी अशी मागणी केली आहे. या मुद्द्यावर खूप वाद सुरू आहे.
सुरक्षा
अलीकडे महिलांची सुरक्षा हा मुद्दा प्रमुख असून अनेकदा महिलांसोबत गैरवर्तनाचे प्रकरण बाहेर येतात. परंतू मातृभूमी लोकलमध्ये असा कुठलाही त्रास नाही.

सुविधा
उपनगरातील अनेक महिला दररोज नोकरी आणि इतर कामामुळे या ट्रेनने कोलकाता पोहचतात. महिलांप्रमाणे मातृभूमी लोकल खूपच सोयस्कर आहे.


यावर अधिक वाचा :