Widgets Magazine
Widgets Magazine

प्रसिद्धीचा परिणाम मोदी त्यांच्या कामावर होत नाही

Last Modified गुरूवार, 13 जुलै 2017 (08:56 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनण्याआधी जसे होते, तसेच आजही आहेत. प्रसिद्धीचा परिणाम त्यांच्या कामावर होत नाही असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
Widgets Magazine
नवी दिल्लीमध्ये द मेकिंग ऑफ लिजेंड या पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. बिंदेश्वर पाठक यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

यावेळी मोहन भागवत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कशालाही असंभव मानत नाहीत.अशक्य ते शक्य करुन दाखवतात. मोदींचं नेतृत्व हे भारतासाठी आशेचं किरण आहे”.
तर अमित शाहा म्हणाले, “मोदी सरकार सत्तेत येण्याआधी त्यांच्यावर परराष्ट्र निती सांभाळता येणार नाही अशी टीका झाली. मात्र आज मोदी सरकारचे सगळ्या देशांशी चांगले संबंध आहेत”.


Widgets Magazine

यावर अधिक वाचा :