Widgets Magazine
Widgets Magazine

आसामच्या महिला शिष्टमंडळाने घेतली राज यांची भेट

शुक्रवार, 14 जुलै 2017 (16:36 IST)

raj thakare
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आसामच्या महिला शिष्टमंडळाने भेट घेतली. आसाममध्येही यूपी-बिहारमधील नागरिकांचा लोंढा वाढत असल्याची समस्या मांडून, या समस्येवर मार्गदर्शनाची विनंती या महिलांनी राज ठाकरेंना केली.
 

दादरमधील ‘कृष्णकुंज’ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आसामच्या महिलांनी त्यांची भेट घेतली. आसाममधील ‘स्वाधीन स्त्री शक्ती’ असे या महिला संघटनेचं नाव आहे.

आसामाच्या महिलांनी राज ठाकरेंची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडलं. महाराष्ट्राप्रमाणेच आसाममध्येही उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांचा लोंढा वाढत आहे. त्यामुळे तेथील भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांवर गदा येत आहे. हीच स्थिती महाराष्ट्रात आहे आणि इथे राज ठाकरे कायम आवाज उठवत असतात. त्यामुळे आसाममधील महिलांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरेंची भेट घेतली.

 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नववी आणि दहावीची भाषांची तोंडी परीक्षा रद्द

नववी आणि दहावीच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून ...

news

युपी : विधानसभेत सत्र चालू असताना स्फोटकं सापडले

उत्तर प्रदेश विधानसभेत सत्र चालू असताना स्फोटकं आढळली आहेत. गुरूवारी विधानसभेच सत्र चालू ...

news

भारतीय जनतेचा सरकारवर अधिक विश्वास

जगातील इतर देशांमधील लोकांच्या तुलनेत भारतीय जनतेचा देशातील सरकारवर अधिक विश्वास असल्याचे ...

news

एक भलामोठा हिमखंड अंटार्क्‍टिकापासून तुटला

एक भलामोठा हिमखंड अंटार्क्‍टिकापासून तुटला आहे. त्यामुळे अंटार्क्‍टिका द्वीपकल्पाचा आकारच ...

Widgets Magazine