Widgets Magazine
Widgets Magazine

आलिशान ‘अँटिलिया’ इमारतीत आग, कुठलीही हानी नाही

मंगळवार, 11 जुलै 2017 (11:41 IST)

antilia

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या आलिशान ‘अँटिलिया’ इमारतीत आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. 

अँटिलियाच्या टेरेसवर आग लागली होती. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आग विझवण्यात यश आलं.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असलेल्या मुकेश अंबानी यांची अँटिलिया ही 27 मजली इमारत दक्षिण मुंबईत अल्टामाऊंट रोडवर आहे. 4 लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत 570 फूट उंच आहे. लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसनंतर अँटिलिया ही कदाचित जगातील दुसरी सर्वात महागडी रहिवासी इमारत आहे. याची किंमत अंदाजे 100 कोटी रुपये इतकी आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

अमरनाथ यात्रा बस हल्ल्यामागे लष्कर ए तोयबा

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर ए ...

news

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन ...

news

लंडनमधील ऐतिहासिक मार्केटला भीषण आग

पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेल्या आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या कॅम्डेन लॉक मार्केटला भीषण ...

news

महिलांना मासिक पाळीची रजा

मुंबईमधील कल्चर मीडिया या कंपनीने मासिक पाळीची रजा सुरू केलीय. अशा प्रकारची रजा देणारी ...

Widgets Magazine