शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 जुलै 2017 (14:22 IST)

अंगावर झाड पडल्याने महिलेचा मृत्यू;महापालिका जबाबदार

मुंबई येथील चेंबूर परिसरात एका महिलेच्या अंगावर अचानक एक झाड पडले होते. त्यामध्ये त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी दाखल केले होता मात्र महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत महिलेचं नाव  कांचन नाथ (वय 58 वर्ष) असं मृत असून त्या योगा टीचर होत्या.

गुरुवारी मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ यांच्यावर स्वस्तिक पार्क परिसरात  चंद्रोदय सोसायटीमध्ये  नारळाचं झाड कोसळलं होते. हा सर्व प्रकार सिसिटीव्ही मध्ये रेकोर्ड झाला होता. त्यांच्यावर सुश्रुत रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र आज पहाटे कांचन नाथ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . महापालिका यामध्ये निष्काळजी वागली आहे. यामध्ये  सोसायटीने 17 फेब्रुवारीला हे झाड कापण्यासाठी अर्ज केला होता. तसंच यासाठी आवश्यक 1380 रुपयांची रक्कमही भरण्यात आली होती. त्यावेळी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी झाडाची पाहणी केली. झाड मजबूत असून ते कापण्याची आवश्यकता नाही, असा अहवालही सोसायटीला दिला होता.त्यामुळे आता सर्व पुरावे घेवून महिलेचे पती हे आता महापालिके विरोधात केस करणार असून न्य्याय मागणार आहेत. महापालिकेच्या अश्या मोठ्या चुकीमुळे एका निष्पाप महिलेचा मृत्यू झाला आहे.