शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2016 (16:47 IST)

आता ‘धनत्रयोदशी’ ला 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन' साजरा होणार

यंदापासून दिवाळीतील धनत्रयोदशी हा दिवस 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला आहे. यंदा पहिला आयुर्वेद दिन २८ ऑक्टोबरला मधुमेहाचे जनजागरण करून साजरा केला जाणार आहे.
 
गेल्या १५ ते २०  वर्षांपासून याबाबत आयुर्वेद क्षेत्रातील जाणकारांकडून मागणी होत होती. भारतीय उपचार पद्धती असलेल्या आयुर्वेदाचा कुठलाही दिनविशेष नव्हता. या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर आयुषचा स्वतंत्र प्रभाग असणारे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी कोणत्या दिवशी आयुर्वेद दिन साजरा करावा, म्हणून मते जाणून घेतली. काहींनी २७ फेब्रुवारी हा दिवस सुचविला. यात १९२० साली याच दिवशी नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारताची आरोग्यपद्धती आयुर्वेद ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र बहुसंख्य आयुर्वेदप्रेमींनी दिवाळीतील धनत्रयोदशी या दिवसाचाच आग्रह धरल्याने मंजूर झाला. आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. मनोज नेसरी (आयुर्वेद) यांनी यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे.