Widgets Magazine

स्वातंत्रदिनानंतर लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

Last Modified शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (11:41 IST)

स्वातंत्रदिनानंतर लगेचच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराद्वारे संयुक्त जनता दल आणि अण्णा द्रमकचा रीतसर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश होणार असून दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याचे समजते.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. यादरम्यान दोन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशावरही चर्चा झाली. संयुक्त जनता दल व अद्रमुककडून प्रत्येकी दोन नेते केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यातील एक मंत्रिपद कॅबिनेट दर्जाचे असेल, तर एक राज्यमंत्री दर्जाचे असेल.यावर अधिक वाचा :