Widgets Magazine

टीव्हीमधील कामासाठी न्यायालयाने सिद्धूला फटकारले

Last Modified शनिवार, 8 एप्रिल 2017 (11:17 IST)

मंत्रिपद मिळाल्यानंतरही टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करण्यासाठी अडून बसलेले पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना न्यायालयाने फटकारले आहे.

एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना चंदिगड येथील पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने सांगितले की केवळ कायदा म्हणजेच सर्व काही असे नाही. पण नैतिकता आणि शुचिता या गोष्टीनाही काही अर्थ असतो. जर तुम्हीच कायद्याचे पालन करणार नसाल तर कोण करणार असा सवालही न्यायालयाने यावेळी केला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 मे रोजी होणार आहे.यावर अधिक वाचा :