शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी पुणे मेट्रो

पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून मात्र भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपलीआहे. एक बाजूला शरद पवार आणि नरेंद्र मोदी जरी एकमेकांचे गुणगान गात असले तरीही ते विरुद्ध आहे हे आता समोर येतंय. पुणे मेट्रो वरून मोठा गोधंळ सगळा दिसून येत आहे.
 
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 डिसेंबरला मेट्रोच्या भूमिपूजनाचा घाट घातलाय तर राष्ट्रवादीने शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजनाचा ठराव मंजूर केलाय. पुणे महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेनं पाठिंबा दिलाय. भाजपने याला विरोध केला आणि शिवसेनेनही भाजपला साथ दिलीय. त्यामुळे राष्ट्रवादी एकटी पडली असून शिवसेना कितीही बोंब मारत असली तरीही सत्ते सोबत आम्ही राहू अशी भूमिका त्यांनी ठेवली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो हे प्रकल्प राष्ट्रवादी नाही तर भाजपने आणले आहे हे पुढे येत आहे.