Widgets Magazine

भानोत कुटुंबीय ‘नीरजा’ निर्मात्यांच्या विरोधात कोर्टात

neeraja bhanot
दिवंगत एअर हॉस्टेस नीरजा भानोतचे कुटुंबीय राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘नीरजा’ चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात कोर्टात गेले आहेत. भानोत कुटुंबीयांनी निर्मात्यांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे. नीरजावर सिनेमा करण्याची परवानगी जेव्हा निर्मात्यांना देण्यात आली, तेव्हा (2 सप्टेंबर 2013) भानोत कुटुंबासोबत एक करार करण्यात आला होता. या करारानुसार निर्मात्यांनी साडेसात लाख रुपयांची रक्कम आणि चित्रपटाला झालेल्या नफ्याच्या 10 टक्के रक्कम देण्याचं ठरलं होतं, असा दावा भानोत कुटुंबीयांनी केला आहे.

ब्लिंग अनप्लग्ड आणि फॉक्स स्टार स्टुडिओज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे ठरल्याप्रमाणे पैसे द्यायला तयार नसल्याने केस दाखल केल्याचं नीरजाच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे पंजाब आणि हरियाणा कोर्टाचे दरवाजे भानोत कुटुंबीयांनी ठोठावले.


यावर अधिक वाचा :