बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2017 (12:54 IST)

नॅशनल फ्लाईंग अकॅडमीचे हेलिकॉप्टर कोसळले, दोघांचा मृत्यू

गोंदियातील बिरसीमध्ये नॅशनल फ्लाईंग अकॅडमीचं (NFTI) हेलिकॉप्टर कोसळले आहे. धापेवाडा देवरी नदीपात्रात हे हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टरमध्ये एका प्रशिक्षकासह एक परीक्षार्थी मुलगी होते. या अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजन गुप्ता आणि शिवानी अशी मृतांची नावं आहेत. बुधवारी सकाळी प्रशिक्षणादरम्यान अपघात झाला. गोंदियातील बिरसी प्रशिक्षण केंद्राच्या हेलिकॉप्टरद्वारे हे ट्रेनिंग सुरू होते. अपघात नेमका कसा झाला, याचा तपास केला जात आहे.