testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नरेंद्र मोदी म्हणाले घोषणा माझ्या; श्रेय गडकरींचे

modin and gadkari
भरूच| Last Modified बुधवार, 8 मार्च 2017 (11:59 IST)
‘घोषणा मी करतो, पण त्याचे श्रेय गडकरींचे असते..अशी स्तुतिसुमने उधळत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, केंद्रीय रस्ते महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी धडाकेबाज काम करतात. त्यांच्या धाडसी निर्णय क्षमतेने देश दिवसाला २२ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधतो आहे,अश्या शब्दात गडकरींचे कौतूक केले आहे.

नितीनजी ज्या पद्धतीने काम करतात, त्यांच्या टीम ज्या झपाटय़ाने काम केले, त्यामुळेच हे भव्य दिव्य काम होऊ शकले, असे सुरुवातीलाच सांगून मोदी म्हणाले, ‘मनमोहनसिंग सरकारच्या काळामध्ये दिवसाला फक्त दोन किलोमीटरचे महामार्ग बांधले जायचे. पण गडकरींनी धक्के देऊन ते प्रमाण प्रतिदिन २२ किलोमीटरवर आणले आहे. त्यांची कल्पकता अचाट आहे. कारण ते तुकडय़ा तुकडय़ांमध्ये विचार करीत नाहीत. अनेक घोषणा मी करतो; पण त्या (पूर्ण करण्याचे) श्रेय गडकरींचे असते.’ या महत्वपूर्ण विधानाचा संदर्भ होता ते गुजरातमधील आठ राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्याच्या घोषणेचा. सुमारे बाराशे किलोमीटरचे हे रस्ते सुमारे बारा हजार कोटी रूपये खर्चून राष्ट्रीय महामार्ग केले जाणार आहेत. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले, ‘गडकरींनी हे काम केले तर गुजरातच्या विकासामध्ये चार चाँद नक्कीच लागतील.’


यावर अधिक वाचा :