Widgets Magazine

यूपीत मंत्र्यांच्या वाहनावर लाल दिवा नाही!

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याअगोदर पासूनच कामाला लागलेल्‍या योगी आदित्यनाथ यांनी मंत्र्यांना धक्‍का दिला आहे.
कोणत्याही मंत्र्याने आपल्या वाहनावर लाल दिवा न लावण्याच्या सूचना योगी आदित्‍यनाथ यांनी दिल्‍या आहेत.त्यामुळे उत्तर प्रदेशमधील
मंत्र्यांच्या आयुष्यातील लाल दिव्याचा योग टळला आहे.

योगी आदित्‍यनाथ यांनी
सर्व मंत्र्यांना आपल्या संपत्तीची माहिती सार्वजनिक करण्याचे निर्देशही दिले आहेत.तसेच
येत्या १५ दिवसांत सर्व अधिकाऱ्यांना आपली चल-अचल संपत्ती जाहीर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना उत्तर प्रदेशमध्ये राबवणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. मागील सरकारच्या भ्रष्टाचाराचा फटका राज्याला बसल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

योगी आदित्यनाथ यांनी शपथविधी घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य आणि लखनऊचे महापौर दिनेश शर्मा यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावर अधिक वाचा :