मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 एप्रिल 2018 (16:30 IST)

लोया यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी नाही

सीबीआय विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सोबतच न्या. लोया यांच्या चौकशीची मागणी करणा-या याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचं कोणतंही कारण नाही. या याचिकांमुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं. न्यायमूर्ती लोयांचा मृत्यू हा नैसर्गिकच आहे. त्यामुळे त्याची स्वतंत्रपणे चौकशीची गरज नाही. तसेच या याचिका म्हणजे न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठानं याचिकाकर्त्यांनाही फटकारलं.

काँग्रेस नेते तहसीन पूनावाला, पत्रकार बी. एस. लोणे, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनसहीत इतर पक्षकारांनी न्या. लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यास नकार दिला आहे.