शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: चेन्नई , मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (08:43 IST)

पनीरसेल्वम तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

अण्णा द्रमुकचे नेते ओ. पन्नीरसेल्व म यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून मध्यरात्री उशिरा शपथ घेतली. त्यांच्यासोबतच अन्य 31 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्य अत्यंत जवळचे मानले जाणारे ओ. पन्नीरसेल्वम यांनाच उत्तराधिकारी म्हणून निवडण्याचा निर्णय अण्णा द्रमुकच्या आमदरांनी घेतला. 
 
शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिली दोन मिनिटं मौन धारण करून जयललितांना श्रद्धांजली वाहिली. 65 वर्षांच्या पनीरसेल्वम यांनी यापूर्वी दोन वेळेस मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला आहे. जयललितांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतरही पनीरसेल्वम यांना भरसभेत अश्रू अनावर झाले होते. 2001-2002 मध्ये पनीरसेल्वम हे राज्याचे मुख्यमंत्री होते.
 
पनीरसेल्वम जयललितांच्या जवळचे होते. ज्यावेळी जयललिता यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली. त्यावेळी त्यांनी पनीरसेल्वम यांच्यावर भरवसा दाखवून त्यांना मुख्यमंत्री केले होते. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी जयललिता यांनी राजीनामा दिल्यानंतर पनीरसेल्वम तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री बनले. सप्टेंबरमध्ये जयललिता यांची प्रकृती खालावली, त्यावेळीही पनीरसेल्वम तामिळनाडू राज्याच्या कार्यकारी मुख्यमंत्रिपदी कायम राहिले. विशेष म्हणजे जयललिता नसतानाही त्यांचा फोटो समोर ठेवून ते कॅबिनेट बैठकीत निर्णय घेत असत. यावरून त्यांची जयललितांवरची निष्ठा दिसून येते. जयललितांचे अत्यंत विश्वासू म्हणून पनीरसेल्वम यांची ओळख आहे.