शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 16 फेब्रुवारी 2017 (11:30 IST)

पंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाइटहून गायब झाले मोदींचे फोटो

निवडणूक आयोगाने बुधवारी आदेश दिले की पंतप्रधान आवास योजनेच्या वेबसाइटहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  वरिष्ठ केंद्रीय मंत्री एम वेंकैया नायडू यांचे फोटो आदर्श निवडणुक आचार संहितेचे उल्लंघन आहे आणि याला ताबडतोब तेथून काढायला पाहिजे. आयोगाच्या आदेशानंतर या फोटोंना तेथून काढण्यात आले आहे.  
 
वेबसाइटवर बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो दिसले नाही आणि न तर आवास व शहरी गरिबी उन्मूलन मंत्री वेंकैया नायडू यांचे फोटो होते.  
 
आयोगाने एका तक्रारीवर कारवाई करत कॅबिनेट सचिव पी के सिन्हा यांना म्हटले, 'पंतप्रधान आणि मंत्र्यांचे फोटो लावणे आदर्श आचार संहितेचे उल्लंघन आहे आणि या कारणामुळे आधिकारिक वेबसाइटहून फोटोंना तत्काल हटवून दिले पाहिजे. आयोगाला हे जाणून घ्यायचे आहे की असे आधी का म्हणून झाले नाही, जेव्हा की आदर्श आचार संहिता चार जानेवारीपासून लागू आहे.'  
 
त्यांनी शीर्ष नोकरशहांना हे सुनिश्चित करण्यास सांगितले की इतर मंत्री किंवा विभागांची वेबसाइटवर असल्या प्रकारचे फोटो नाही लावायला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे पंजाब, उत्तराखंड आणि गोवामध्ये निवडणूक संपन्न झाले आहे जेव्हा की उत्तर प्रदेश आणि  मणीपुरामध्ये निवडणुका होणे बाकी आहे.