testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबई सायबर सेलकडून २७ तरूणांना नोटीसा

Last Modified शनिवार, 23 सप्टेंबर 2017 (10:23 IST)

फेसबुकवर वादग्रस्त लिखाण करणा-या एका तरूणाचे फेसबुक फ्रेंड असल्याच्या कारणावरून २७ तरूणांना मुंबई सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शासनाच्या शेतकरी विरोधी व इतर चुकीच्या धोरणांवर टीका करण्यात आल्याने या नोटीसा पाठविण्यात आल्याचा आरोप नोटीसा मिळालेल्या तरूणांनी केला आहे. पोलिसांनी पाठविलेल्या या नोटीसा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे स्पष्ट करून सोशल मीडियावर याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आहे.

मुंबईच्या सायबर पोलीस ठाण्यात फेसबुकवर देव गायकवाड या नावाने आक्षेपार्ह लिखाण एका तरुणाविरुद्ध

विनयभंग, बनावट अकाऊंट उघडून फसवणूक आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याचबरोबर अधिक चौकशीसाठी त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या तरूणांना सायबर सेलच्या पोलिसांनी नोटीसा पाठविल्या आहेत.यावर अधिक वाचा :