Widgets Magazine
Widgets Magazine

मी या संसदेची निर्मिती आहे : प्रणव मुखर्जी

सोमवार, 24 जुलै 2017 (11:12 IST)

pranab mukharjee

लोकशाहीच्या मंदिरात अर्थात संसदेत माझ्या विचारांना पैलू पडले, मी या संसदेची निर्मिती आहे असं म्हटलं तर चुकीचं वाटायला नको, २२ जुलै १९६९ हा माझा संसदेतला पहिला दिवस होता. निरोपाचं भाषण करताना मला संसदेतला पहिला दिवस आठवतो आहे, राष्ट्रपती म्हणून मी आता या सभागृहाचा निरोप घेतो आहे हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणिय आहे असे सांगत मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी संसदेचा निरोप घेतला.

या सभागृहाशी असलेली माझी बांधिलकी याहीपुढे कायम राहिल, १९६९ पासून आजवर या सभागृहात मी अनेक घडामोडी पाहिल्या आहेत. विरोधी बाकांवरच्या खासदारांची भूमिकाही मी पाहिली आहे आणि सत्ताधारी पक्षांचीही भूमिका पाहिली आहे. संसदेतले गदारोळही पाहिले आहेत आणि एखाद्या घटनेवर किंवा विधेयकावर होणारी एकवाक्यताही पाहिली आहे. मी गेल्या ३७ वर्षांमध्ये अनेक बदल पाहिले आहेत. आता हे सभागृह सोडताना हे सगळं काही माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आहे असंही प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचं अध्यक्षपद पुन्हा शिवसेनेकडेच आले आहे. शिवसेना नेते ...

news

गोव्यातही धरणे ८० टक्क्यांवर…

राज्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे बहुतेक सर्व महत्त्वाच्या ...

news

इंग्लंडमध्ये ही भारतीय महिला आहे जेलर

इंग्लंडमधील रिसले इथल्या पुरुष कारागृहावर भारतीय वंशाच्या पिया सिन्हा जेलर म्हणून काम ...

news

एनडीएच्या एका छात्राची गळफास घेऊन आत्महत्या

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)तील एका छात्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ...

Widgets Magazine