testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कैदी मंजुळा शेट्ये प्रकरण, जेल प्रशासनाचा अहवाल सादर

manjusha
Last Modified गुरूवार, 29 जून 2017 (16:42 IST)

भायखळा तुरुंगात महिला कैदी मंजुळा शेट्ये यांच्या मृत्यूप्रकरणी जेल प्रशासनाकडून अहवाल सादर करण्यात आला. यात

मंजुळाच्या गुप्तांगाला जखमा नाहीत, असा दावा जेल प्रशासनाने केला आहे.

याच जेलमधील कैदी इंद्राणी मुखर्जीने कोर्टात धक्कादायक माहिती दिली होती. मंजुळावरही निर्भयासारखेच अत्याचार झाले होते, असा दावा इंद्राणीने कोर्टात केला होता.
भायखळा जेलप्रशासनाविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीची सेशन कोर्टासमोर साक्ष नोंदवण्यात आली. मंजुळा शेट्येच्या हत्येपूर्वी तिच्यावर अनन्वित अत्याचार झाल्याचा आरोप इंद्राणीनं कोर्टासमोर केला. गुप्तांगामध्ये रॉड टाकून मंजुळा शेट्येवर लैंगिक अत्याचार केल्याचं इंद्राणींनं कोर्टासमोर सांगितलं.यावर अधिक वाचा :