शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जून 2017 (17:59 IST)

प्रोटोकॉल तोडत राजनाथ सिंहांनी घेतली जवानाची गळाभेट

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रोटोकॉल तोडत एका जवानाची गळाभेट घेतली. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झालेल्या गोळीबारात जखमी झाल्याने अपंगत्व आलेल्या या जवानाची गळाभेट घेत राजनाथ सिंह यांनी त्याच्या साहसाचं कौतुक केलं.

गोधराज मीना असं या जवानांचं नाव असून गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी शौर्य पदक देऊन त्याचा सन्मान केला.  2014 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक गोळ्या लागल्याने गोधराज गंभीर जखमी झाले होते. शौर्य पदक दिल्यानंतर आपलं 85 टक्के शरिर हालचाल करत नसतानाही त्यांनी सलामी देण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रभावित झालेल्या राजनाथ सिंह यांनी प्रोटोकॉल तोडत पुढे जाऊन त्यांची गळाभेट घेतली.