Widgets Magazine
Widgets Magazine

पेशेवर कार रेसर आणि त्याच्या बायकोचे कार अपघातात जळून मृत्यू

चेन्नई, शनिवार, 18 मार्च 2017 (10:56 IST)

aswin sundar

प्रफेशनल कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची बायको निवेदताची एका कार अपघातात मृत्यू झाला आहे. त्याची बीएमडब्ल्यू कार चेन्नईच्या सँथम रोडवर कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. चेन्नईच्या संतहोम हाय रोडवर हा भीषण अपघात घडला. अश्विनच्या बीएमडब्ल्यू कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गाडीला धडक दिली आणि लगेच पेट घेतला. 
 
अश्विन आणि निवेदीता दोघांना कारचे दरवाजे उघडता न आल्याने आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. अपघाताच्यावेळी अश्विन गाडी चालवत होता. निवेदीता डॉक्टर होती ती एका खासगी रुग्णालयात नोकरीला होती. आगीच्या ज्वाळांनी वेढलेली गाडी पाहिल्यानंतर रस्त्यावरुन जाणा-या वाटसरुंनी लगेच चेन्नई पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अग्निशमन अधिका-यांनाच आगीवर नियंत्रण मिळवायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला.
 
शव पूर्णपणे जळाल्यामुळे सुरुवातीत त्यांना ओळखणे फारच अवघड झाले होते. नंतर कारच्या रजिस्ट्रेशन नंबरमुळे पोलिसांना त्यांची ओळख पटली. अश्विन आणि त्याची बायको अलकापक्कम भागात राहत होते. ते एमआरसी नगरमध्ये आपल्या मित्राला भेटायला आले होते. येथुन घरी जाताना हा अपघात झाला.  
 
पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

भिवंडीत टायराच्या गोदामात आग

भिवंडीत सिटी सोल्युशन्स टायरच्या गोदामाला आग लागली

news

कर्जमाफीच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्र्यांची भेट

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंत्री व ...

news

राज्याचा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला जाणार

राज्याचा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष ...

news

उत्तराखंड : मुख्यमंत्रीपदी त्रिवेंद्र सिंह रावत

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी त्रिवेंद्र सिंह रावत यांची निवड झाली आहे. शनिवारी दुपारी 3 ...

Widgets Magazine