Widgets Magazine

तब्बल 250 कोटींच्या बंगल्यात राहते राधे माँ

radhe maa
आखाडा परिषदेने 14 भोंदूबाबांची यादी जारी केली. या यादीतील स्वत:ला देवीचा अवतार सांगणार्‍या सुखविंदर कौर उर्फ राधे माँ विविध कारणांने वादग्रस्त ठरलेली आहे. जगाला मोह-मायेपासून दूर राहण्याचा उपदेश देणारी ही राधष स्वत: मा‍ि लक्झरी लाईफ जगते.

राधे माँ, मुंबईच्या चिकूवाडीमधील नंद नंदन भवन नावाच्या आलिशान बंगल्यात राहते. या बंगल्याची तब्बल 250 कोटी इतकी आहे. ज्या खोलीत राधे माँ आपल्या भक्तांना भेटते तिथे मखमली बेड, एसी, फॅन्सी लायटिंग सहित तमाम सुखसुविधा आहेत. भक्ततांना ही राधे माँ एका खास खोलीत भेटते, ज्यात बेडशीटपासून ते पडद्यापर्यंत सर्वकाही लालेलाल असते. या खोलीतील राधे माँच्या असनाच्या ठीक वर दुर्गादेवीची मूर्तीही आहे.
राधे माँच्या सांगण्यानुसार ती आपल्या भक्तांच्या घरी राहते, परंतू मीडिया रिपोर्टनुसार, तिच्याकडे तब्बल 1 हजार कोटींची प्रापर्टी असल्याचा आरोप आहे.


यावर अधिक वाचा :