शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 फेब्रुवारी 2018 (17:01 IST)

राजस्थान : रामदेवबाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पतंजली उद्योगाचे प्रमुख रामदेवबाबा यांच्या विरोधात राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतंजलीच्या बिस्किटांमध्ये मैदा आणि प्राणिजन्य पदार्थ आढळून आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. राजस्थानच्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी रामदेवबाबांनी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी कलम ४२० आणि १२० बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   रामदेवबाबा यांनी सर्व आरोप फेटाळले असून एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने तक्रारदार आणि राजस्थान सरकार यांना नोटिसा पाठवून उत्तर मागवले आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी २० मार्चपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. 

अजमेर येथील एस.के. सिंह यांनी पतंजलीच्या बिस्किटांमध्ये मैदा असल्याचा दावा केला होता. या बिस्किटांची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर त्यात मैद्यासह प्राणीजन्य पदार्थही आढळले आहेत. मात्र पतंजलीची बिस्किटे मैदाविरहीत असल्याची जाहिरात करण्यात येत आहे.