Widgets Magazine
Widgets Magazine

अखेर राठोड दाम्पत्य बडतर्फ

बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (09:27 IST)

rathore couple

एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा खोटा दावा करणाऱ्या पुणे पोलिस खात्यातील दाम्पत्याला बडतर्फ करण्यात आलं आहे. राठोड दाम्पत्याने केलेल्या खोट्या दाव्यामुळे पोलिस दलाची बदनामी झाल्याचं कारण देण्यात आलं आहे.

तारकेश्वरी आणि दिनेश राठोड या पोलिस कॉन्स्टेबल दाम्पत्याने 23 मे 2016 रोजी एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा केला होता. 5 जून 2016 रोजी पत्रकार परिषद घेऊन एव्हरेस्ट सर करणारे पहिले पती-पत्नी असल्याचा दावाही राठोड दाम्पत्याने केला होता.

त्यांच्या या दाव्याबद्दल गिर्यारोहकांनी शंका उपस्थित केल्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली छळ केल्याने आपला गर्भपात झाला, असा आरोप तारकेश्वरी राठोड यांनी केला होता. प्रथमदर्शनी राठोड दाम्पत्य खोटं बोलत असल्याचं आढळल्याने 16 नोव्हेंबर 2016 रोजी दोघांना पोलिस दलातुन निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांसमोर राठोड दाम्पत्य त्यांची बाजू मांडण्यासाठी हजरच राहिले नाहीत.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

संसदेत पाचशे आणि दोन हजारच्या नोटांवरून गोंधळ

पाचशे आणि दोन हजारच्या नोटा संसदेत दाखवत नोटांचे डिझाईन आणि आकार वेगवेगळ्या असल्याचे ...

news

मुंबई : मराठा मोर्चाची तयारी पूर्ण

मुंबईत मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उद्या दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना ...

news

कानडी शिका नाहीतर नोकरी सोडा

कर्नाटका विकास प्राधिकरणने बँकेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येत्या ६ महिन्यात कानडी ...

news

अमरनाथ यात्रा संपली

काश्‍मिरातील अमरनाथ यात्रेची सांगता झाली आहे. या यात्रेत एकूण 2 लाख 60 हजार यात्रेकरूंनी ...

Widgets Magazine