Widgets Magazine
Widgets Magazine

सासूने सुनेला केली मदत, मिळवून दिली 4 कोटींची पोटगी

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:29 IST)

मुलगा आणि सून घटस्फोटानंतर वेगळे झाल्यावर मुलाकडून सुनेला 4 कोटींची पोटगी मिळवून देण्यासाठी एकाने सासूने तिच्या सुनेला मदत केली आहे. घटस्फोटानंतर सुनेला तिचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे करता यावा त्यासाठी या महिलेने तिच्या सुनेला पाठिंबा दिला. कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी देवानंद शिवशंकरप्पा काशप्पनावर यांना 60 दिवसांच्या आतमध्ये त्यांच्या पत्नीला 4 कोटी रूपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. देवानंद शिवशंकरप्पा कर्नाटकचे माजी दिवंगत मंत्री एस.एस. काशप्पनावर यांचा मुलगा आहे.

कौटुंबिक न्यायालयाने 24 जुलै रोजी हा निर्णय दिला. या प्रकरणातील  विशेष बाब म्हणजे कोर्टात देवानंद यांच्या आईने सुनेच्या बाजूने साक्ष दिली. या प्रकरणातील सुनेने 2015मध्ये  पतीपासून वेगळं होण्यासाठी आणि 4.85 कोटी रूपये पोटगी मिळावी, यासाठी याचिका दाखल केली होती. या मागणीला कोर्टाने मंजुरी दिली आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

एकावन्न कला अविष्कारांचा नाशिक ढोलचा विक्रम

नशिकचा ढोल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यातही नाशिक मधील अनेक पथके नव नवीन प्रयोग करत ...

news

मुंबई: बेस्ट कामगारांचा संप अखेर मागे

मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला बेस्ट कामगारांचा संप अखेर मागे घेण्यात आला ...

news

दहीहंडीवरील सुनावणी , उंचीचे सर्व निर्बंध मागे

दहीहंडीच्या थरांच्या उंचीवर घालण्यात आलेले उंचीचे सर्व निर्बंध मागे घेत असल्याचा, ...

news

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची पक्षातून ...

Widgets Magazine