गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

RSSची तीन दिवसात सेना तयार करण्याची तयारी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले की गरज पडल्यास देशाकरिता लढण्यासाठी आरएसएसकडे 3 दिवसात सेना तयार करण्याची क्षमता आहे. 6 दिवसीय मुजफ्फरनगर यात्रेच्या शेवटल्या दिवशी जिल्हा मैदानातील शाळेत संबोधित करताना भागवत यांनी म्हटले की सेनेला सैन्यकर्मी तयार करायला 6 ते 7 महिने लागून जातील परंतू संघाचे स्वयंसेवक 3 दिवसात हे काम करू शकतात.
 
ही आमची क्षमता आहे परंतू आम्ही सैन्य संघटन नाही, पारिवारिक संघटन आहे परंतू संघात मिलिटरीसारखे अनुशासन आहे. जर देशाला आवश्यकता असल्यास किंवा संविधान परवानगी देत असल्यास स्वयंसेवक मोर्चा सांभाळतील. त्यांनी म्हटले की आरएसएसचे स्वयंसेवक मातृभूमीच्या रक्षेसाठी हसत-खिदळत बलिदानासाठी तयार असतात. देशात विपदा आल्यास स्वयंसेवक हाजिर असतात. त्यांनी भारत-चीन युद्धाची चर्चा करत म्हटले की चीनवर हल्ला झाला तेव्हा मिलिटरी फोर्स येईपर्यंत संघाचे स्वयंसेवक सीमेवर ताट उभे राहिले. स्वयंसेवक आपली जबाबदारी पूर्णपणे पार पडतात. 
 
तसेच राजद प्रदेश प्रवक्ता मृत्युंजय तिवारी यांनी भागवत यांचे वक्तव्य सेनेसाठी अपमानजनक आणि त्यांचे मनोबल मोडणारे असल्याचे म्हणत माफी मागण्याची मागणी केली आहे.