बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

योग्य कारण असल्यास गर्भपात शक्य - सर्वोच्च न्यायालय

आईच्या गर्भातील असलेले अपत्य जात  सुदृढ नसेल आणि भविष्यात मोठा धोका असले तर  गर्भपात करण्याची परवानगी मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली आहे. यासंदर्भात मुंबईतल्या एका महिलेनं आपल्या पतीच्या नावाने याचिका दाखल केली आहे.त्यामध्ये तिने सर्व वैद्यकीय कारणे आणि इतर महत्वाच्या गोष्टी कोर्टासमोर ठेवल्या होत्या.

या महिलेचा गर्भ २१ आठवड्यांपेक्षा जास्त असल्यामुळे, कायद्याने तिला गर्भपात करता येत नव्हता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीची आवश्यकता होती. गर्भाची वाढ योग्य प्रकारे होत नसल्याचा मुंबईतल्या डॉक्टरांचा अहवाल याचिकाकर्त्यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला सादर केला होता.  हा अहवाला पाहून कोर्टाने निर्णय दिला आहे.