शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (10:09 IST)

बंगाल दीदी सोबत आता मराठी वाघ

देशच्या राजकारणात काय होईल हे संगता येत नाही तसेच आता दिसून येत आहे. होये हे खरे आहे आता बंगाल ची दीदी आणि मराठी वाघ आता सोबत लढणार आहेत. 
वृत्त असे की नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनं पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसशी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली असून आम्ही शिवसेनेसोबत असल्याचं बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.त्यामुळे  देशात एका बाजूला  पवार  मोदी   मिलाफ  पाहिला  ममात्र हा नवीन  सहयोग पहावयास मिळत आहे. 
 
दिल्लीत सुरू होणा-या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेही आपले मोहरे टाकण्यास सुरुवात केली आहे. राज्यात काडीची आणि देशात  काहीच नाही अशी किमत शिवसेनेची  झाली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी, मोदींना पवार चालत असेल तर आपल्याला ममता बॅनर्जी का चालणार नाही असा सवाल उपस्थित करत एकत्र रस्त्यावर उतरण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन सरकारला फार अवघड जाणार हे नक्की असे चित्र तरी आहे.