शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

स्मृती इराणीवर शेतकऱ्याने फेकल्या बांगड्या

गुजरातमधील अमरेली येथे केंद्रिय मंत्री स्मृती इराणी एका कार्यक्रमासाठी गेल्या असता त्यांच्या दिशेनं एका शेतकऱ्याने बांगड्या फेकल्याची घटना घडली .  त्या व्यासपीठावर भाषण करत असताना एका शेतकऱ्याने त्यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या. केतन कासवाल असे त्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासवाल याला घेऊन जात असताना स्मृती इराणी यांनी त्याला सोडून द्यायची विनंती केली होती. त्याला बांगड्या फेकू देत. मी याच बांगड्या त्याच्या बायकोला भेट देईन, असे इराणी यांनी म्हटले. गुजरात मध्ये निवडणुकीचे वारे वाहत असून आशा घटना घडू शकतात याचा मला अंदाज यापूर्वीच होता. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, एका महिलेवर आक्रमण करण्यासाठी त्यांनी पुरुषाला पाठवलं आहे. काँग्रेसची ही रणनीती चुकीची आहे अशी टीका केली.