Widgets Magazine

कोबीमध्ये होता साप, शिजवून खाल्ला आई-लेकीने

इंदूर- मध्यप्रदेशातील इंदूर येथे 35 वर्षीय महिलेने कोबीत असलेल्या सापाच्या पिल्लूला नकळत कापून शिजवले आणि शिजवलेली भाजी आपल्या मुलीसोबत खाल्ली. तब्येत बिघडल्यावर आई-लेकीला येथील रूग्णालयात भरती केले गेले.

शासकीय महाराजा यशवंतराव चिकित्सालयच्या मेडिसिन विभागातील डॉक्टर धर्मेंद्र झंवर यांनी सांगितले की खजराना क्षेत्रातील रहिवासी आफजान इमाम (35) आणि त्यांची मुलगी आमना (15) दोघींना रूग्णालयात भरती केले गेले आहे. त्यांनी घरात कोबीची भाजी शिजवून खाल्ली ज्यात सापाचा पिल्लू होतं. जेवण्याच्या काही वेळानंतर त्यांना भाजीत त्याचे अंश दिसले. नंतर त्यांची तब्येत गडबडली आणि उलट्या सुरू झाल्या.
डॉक्टरप्रमाणे दोघींवर उपचार सुरू असून तपासणी केली जात आहे की शरीरात विषाचा प्रभाव तर नाही. साधारणात सापाचे विष तोपर्यंत प्राणघातक नसतं जोपर्यंत ते रक्ताद्वारे मनुष्याच्या शरीरात शिरत नाही, असे डॉक्टर झंवर यांनी सांगितले. सध्या आई-लेकीची तब्येत स्थिर आहे.


यावर अधिक वाचा :