बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (11:52 IST)

सोनिया गांधी देणार काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

सोनिया गांधी यांनी प्रकृती अस्वस्थामुळे अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. 
 
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पुढील वर्षीच्या पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांनंतर आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. आरोग्याच्या समस्यांमुळे त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी एका वृतसंस्थेला दिली आहे.
 
सूत्रांनी सांगितले की, प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्या निवडणुकांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा देणार होत्या. मात्र, पुढील वर्षी पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपर्यंत तरी सोनिया गांधींनी अध्यक्षपदावर कायम राहावे, अशी इच्छा पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी बोलून दाखवली. 
 
नुकत्याच झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत सोनिया गांधींची अध्यक्षपदी फेरनिवड झाली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्या आपल्या पदाचा कार्यकाळही पूर्ण करू शकत नाहीत. या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर लगेच त्या आपल्या पदाचा राजीनामा देतील, असे सूत्रांनी सांगितले आहे. सोनिया गांधी यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. ते पक्षाध्यक्ष व्हावेत, अशी इच्छा त्यांच्या पक्षातील तरुण नेत्यांची आहे. 
 
फेब्रुवारी १, २०१७ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसची ताकद कमी झाल्याचे प्रकर्षाने जाणवले आहे. या निवडणुकांत पक्षाची ताकद दाखवून देण्याची संधी आहे, असेही सूत्रांनी सांगितले