testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती...

मुंबई| Last Updated: गुरूवार, 18 मे 2017 (17:18 IST)
- हेर असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही , पाकचे पुरावे पुरेसे नाहीत : आंतरराष्ट्रीय न्यायालय
- कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती.
- कुलभूषण जाधव यांच्यावर लावलेला हेरगिरीचा आरोप सिद्ध झालेला नाही - आंतरराष्ट्रीय न्यायालय.
- कुलभूषण जाधव यांच्या अटकेची परिस्थिती संदिग्ध आणि वादग्रस्त - आंतरराष्ट्रीय न्यायालय.
- आपल्या नागरिकाशी संपर्क साधण्याचा भारताला हक्क - आंतरराष्ट्रीय न्यायालय.
- जोपर्यंत आंतरराष्ट्रीय कोर्ट अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही.
- फाशी देता येईल हे पाकिस्तान ठरवू शकत नाही.
- जाधव हे जासूस असल्याचे अद्याप सिद्ध नाही.
- जाधव यांना कॉन्सुलर अॅक्सेस मिळायला हवा
- आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल
- आर्टीकल ३६ योग्य आहे
- १९७७ च्या विएन्ना समझौता नुसार भारताचे अपील योग्य आहे.
ही शिक्षा रद्द करावी अथवा अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती द्यावी, अशी भारताची विनंती आहे. पाकिस्तानने मात्र, तातडीने स्थगिती देण्याची गरज नाही. कारण जाधव यांना आमच्याच देशात अपील करण्यास पाच महिन्यांचा अवधी आहे, असे म्हटले. मात्र, मध्यंतरी जाधव यांच्या आईने केलेले जे अपील भारतीय उच्चायुक्तांनी सुपुर्द केले, त्याचे पुढे काय झाले ते पाकिस्तानने कळविलेले नाही.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी प्रसिद्ध वकिल हरीश साळवे यांनी फी म्हणून फक्त 1 रुपये आकारल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. हरीश साळवे यांच्या नियुक्तीवरुन केंद्र सरकारवर टीका झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ही माहिती दिली. भारताला हरीश साळवे यांच्या इतकाच सक्षम दुसरा वकील स्वस्तात मिळू शकला असता अशी टीका एका टि्वटर युझरने केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी साळवे यांच्या ''फी''चा आकडा जाहीर केला.
कोण आहेत कुलभूषण जाधव?

कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.
कोण आहेत हरीश साळवे?

हरीश साळवे हे दिवंगत काँग्रेस नेते एनकेपी साळवे यांचे सुपूत्र. भारतातील महागड्या वकिलांमध्ये त्यांचा समावेश होतो. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार सर्वोच्च न्यायालयात एका दिवसाच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी ते 30 लाख रुपये आकारतात. भारताचे माजी सॉलिसीटर जनरल राहिलेले हरीश साळवे आता लंडनमध्ये स्थायिक आहेत. चार्टर्ड अकाऊंटट म्हणून कारर्कीद सुरू केल्यानंतर ते वकिली पेशाकडे वळले. सुरुवातीला त्यांनी नाना पालखीवाला आणि सोली सोराबजी या भारताच्या दोन कायदेतज्ज्ञांकडे प्रॅक्टीस केली. 1992 साली साळवे सुप्रीम कोर्टात वरिष्ठ वकील पदावर कार्यरत झाले. त्यानंतर 1999 साली ते भारताचे सॉलिसिटर जनरल झाले. ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे नागपूरचे सुपुत्र आहेत.

कुलभूषण जाधवप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात (इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस-आयसीजे) मागितलेली दाद हा ‘विचारपूर्वक घेतलेला निर्णय’ होता. कारण भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानात बेकायदेशीरपणे डांबून ठेवले गेले आहे व त्यांच्या जीविताला धोकाही आहे, असे परराष्ट्र मंत्रालयानं सांगितले. भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधवप्रकरणी दाद का मागितली, असे वार्ताहरांनी विचारले असता मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले की, ‘भारताने जाधव यांची भेट घेण्यासाठी 16 वेळा केलेली विनंती पाकिस्तानने फेटाळली. भेट नाकारणे हे व्हिएन्ना कराराचे उल्लंघन होते. जाधव यांच्या कुटुंबीयांना व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती 27 एप्रिल रोजी पाकला करण्यात आली होती. त्यानुसार व्हिसा मान्य करण्यात आला आहे.’


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...