testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

एनडीएच्या एका छात्राची गळफास घेऊन आत्महत्या

NDA student
पुणे| Last Modified सोमवार, 24 जुलै 2017 (07:50 IST)
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)तील एका छात्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आलेख जैसवाल (वय 19 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या छात्राचे नाव आहे.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, आलेख हा एनडीएच्या पाचव्या टर्मचा विद्यार्थी होता. तो मुळचा छत्तीसगढ मधील अंबिकापुरचा रहिवाशी तेथील सैनिकी शाळेमधुन त्याने शालेय शिक्षण घेतले होते, रविवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास वसतिगृहाच्या एच स्क्वाड्रनच्या खोलीमध्ये त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही, या घटनेची माहिती मिळताच एनडीएतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याची माहिती स्थानिक पोलिस आणि त्याच्या नातेवाईकांना देखील दिली. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच लष्करा कडून चौकशी (कोर्ट ऑफ इनक्वायरी) करण्यात असल्याचेही सांगण्यात आले.


यावर अधिक वाचा :