शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (14:16 IST)

शशिकला यांना तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार व्ही. के. शशिकला यांची आत्मसमर्पण करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तुम्हाला तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले असून, या आदेशात कोणताही बदल केला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दिलेल्या आदेशातील एकही शब्द बदलण्याचा आमचा विचार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांची तुरुंगवारी अटळ केली आहे. शशिकला यांना ६0 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्याप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवत चार वर्षांची शिक्षा आणि दहा कोटी रुपये दंड  सुनावला असून आत्मसर्पण करण्याचा आदेश दिला आहे.